लोहपुरुषांच्या जयंतीनिमित्त श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये राष्ट्रीय एकता दिन उत्साहात
National Unity Day celebrated with enthusiasm at Shri Swaminarayan Gurukul on the occasion of the birth anniversary of the Iron Man भुसावळ (31 ऑक्टोबर 2025) : साकेगाव येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयात शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्था संचालक गोपाळ भगत होते.
यावेळी मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, मुख्याध्यापक मनोज भोसले , तसेच महेश चोपडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदर व्यक्त करण्यात आला. अध्यक्षांनी आपल्या मनोगतात सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या कार्याचा गौरव करत राष्ट्रीय एकतेचे महत्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन मनोज भोसले सरांनी केले. त्यात त्यांनी देशाच्या अखंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.





