ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा मोठा दावा : फलटण प्रकरणात एसटीआयटी नेमल्याचे वृत्त खोटे


Thackeray group leader Sushma Andhare’s big claim: News of STIT being appointed in Phaltan case is false मुंंबई (3 नोव्हेंबर 2025) : राज्यात गाजत असलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात एसआयटी नेमण्याचा केलेेला दावा खोटा असल्याचे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

निंबाळकरांच्या सभ्य पणावा विश्वास !
अंधारे पुढे म्हणाल्या की, मला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आकस नाही. ते आज संध्याकाळी सभा घेऊन उत्तर देणार आहेत. पण त्याऐवजी त्यांनी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी. मी तुमची बहीण आहे, तुमच्या गावची पाहुणी आहे. तुमच्या सभ्यपणावर माझा विश्वास आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. य






नेमणुकीच्या पत्रात स्पष्ट उल्लेख
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेमणुकीचे पत्र वाचा त्यामध्ये स्पष्ट म्हटले आहे की, याप्रकरणात तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नेमणूक केली जाईल, असे म्हटले आहे. काल भाजपचा एक बोलघेवडा नेता मला म्हणत होता, अहो तुम्हाला कळत नाही पण माझ्याकडे सरकारने केलेल्या नियुक्तीचे पत्र आहे. खरंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही त्यासाठी न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत. हे आत्महत्या प्रकरणात राजकारणापासून प्रभावमुक्त होऊ शकत नाही, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. यावर आता भाजपचे नेते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर या बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निंबाळकरांच्या सभेकडे लक्ष
फलटणधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले. या आरोपांचे खंडन करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटण नगरीमध्ये सभा होत आहे. आज संध्याकाळी सहा वाजता फलटणी मधील ऐतिहासिक अशा गजानन चौकात ही सभा पार होत असून ते काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !