भुसावळातील निशांत सिंगचे सीए परीक्षेत यश
Nishant Singh from Bhusawal succeeds in CA exam भुसावळ (5 नोव्हेंबर 2025) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत शिवदत्त नगर येथील निशांत त्रिभुवन सिंग यांनी यश मिळविले. न्स्टिट्यूट तर्फे 3 रोजी सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. सप्टेंबर 2025 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
निशांत हा डॉक्टर त्रिभुवन सिंग व साधना सिंग यांचा मुलगा आहे. त्याने आपले दहावी व बारावीचे शिक्षण केंद्रीय विद्यालय भुसावळ येथून पूर्ण केले. त्यानंतर बी.कॉम आणि एम.कॉम शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथून पूर्ण केले. सीए परीक्षेच्या तयारीसाठी निशांतने स्वतःला झोकून दिले. आई-वडिलांचे आशीर्वाद, सीए योगिता स्वामी (भुसावळ) यांचे प्रोत्साहन व पुणे येथील मार्गदर्शक शिक्षक, मित्र व नातेवाईकांना निशांतने आपल्या यशाचे श्रेय दिले.





निकालानंतर भुसावळ ते शिरसाळा मारुती मंदिर देवस्थान पर्यंत पायी प्रवास
निकालानंतर निशांत सिंग याने 4 रोजी सकाळी तीन वाजेपासून भुसावळ येथून शिरसाळा मारुती मंदिर देवस्थान पर्यंत पायी प्रवास करत दर्शन घेतले. श्रद्धा आणि परिश्रम याचे उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत करुन सीए पर्यंतचा प्रेरणादायी प्रवासाबद्दल शिवदत्तनगर भागातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
