11 वाळू माफियांची टोळी तडीपार
11 Sand mafia gangs in exile जालना (12 नोव्हेंबर 2025) : जालना जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात पोलिसांनी कठोर पाऊल उचलत गोंदी पोलिस ठाणे अंतर्गत 11 आरोपींना जालना जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याने वाळू माफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांचे आदेश जारी केलेत. (लीळाश छशुी)
गंभीर गुन्हे दाखल असलेले हद्दपार
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी जवळील गोंदी आणि सिद्धेश्वर फाटा परिसरात हे आरोपी सक्रिय होते. गेल्या काही महिन्यांपासून या भागात वाळू चोरी, मारहाण, खंडणी आणि दहशत निर्माण करणार्या घटनांची मालिका सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्तहोते. या सर्वांविरुद्ध शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीदरम्यान या टोळ्यांकडून कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हे संशयीत झाले हद्दपार
किशोर प्रभु खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विश्वंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, आजीनाथ दत्ता शिंदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, गणेश कैलास मरकड आणि अवधुत दत्ता मिटकुल हे सर्वजण अंबड तालुक्यातील गोंदी व सिद्धेश्वर फाटा परिसरातील रहिवासी आहेत.


