सेवानिवृत्त अधिकार्‍याला नफ्याच्या आमिषाने 33 लाखांचा गंडा


Retired officer duped of Rs 33 lakhs with promise of profit कोल्हापूर (12 नोव्हेंबर 2025) : शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याच्या आमिषांना गुंतवणूक करण्यास भाग पाडत सेवानिवृत्त कर्मचार्‍याला 33 लाखांचा गंडा घालण्यात आला.

काय घडले सेवानिवृत्तासोबत ?
शासनाच्या पशू संवर्धन विभागाचे निवृत्त अधिकारी विजयानंद रत्नाकर पाटील (59, रा. नलवडे प्लॉट, प्रतिभानगर, कोल्हापूर) यांची 33 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. 1 मे ते 8 जून 2025 अखेर व्हॉटस् अ‍ॅपवर लिंकवरील चॅटिंगद्वारे पाच मोबाइल क्रमांकाद्वारे श्रीकृष्णरथ असे नाव सांगणार्‍याने त्यांची फसवणूक केली.

पोलिस फिर्यादीत म्हटले आहे, की पाटील हे वर्षापूर्वीच निवृत्त झाले आहेत. शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणुकीसंबंधी मोबाइलवर माहिती घेताना गुगल प्ले स्टोअरमध्ये काही प असल्याचे त्यांना समजले. दरम्यान, पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावरील व्हॉटसपवर 9341810051, 8962983792, 9685359141, 6299633269, 7488717384 या मोबाइल क्रमांकावरून मेसेज येत होते. पाटील यांना ‘ अबाउट वेल्थ मॅनेजमेंट कम्युनिटी’ असे इंग्रजीत लि. कोलकत्ता या कंपनीचे सेबीने स्टॉक ब्रोकर म्हणून नोंदणीकृत प्रमाणपत्र पाठविले. 7488717384 या व्हॉटसपवर श्रीकृष्णरथ नावच्या व्यक्तीने पहिल्यांदा पाटील यांना व्हिडिओ कॉल करून पडताळणी करून खात्री करून घेतली.

व्हॉट्सपवर लिंक पाठवून पाटील यांना अबाउट वेल्थ मॅनेजमेंट या नावाचे शेअर्स ट्रेडिंगचे बनावट अ‍ॅप सुरू करण्यास भाग पाडले. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेऊन पाटील यांना शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त नफा असल्याचे सांगत विश्वास मिळवला. बँक खाते क्रमांक देऊन पैसे गुंतवण्यास सांगितले. पाटील यांनी मे महिन्यात पहिल्यांदा एक लाख रुपये गुंतवले. यावर अ‍ॅपवर त्यांना 15 हजार रुपये जादा दिसू लागले मात्र काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते निघत नव्हते. हे पैसे काढायचे असतील तर पुन्हा पैसे भरावे लागतील. असे सांगत पाटील यांना 8 जून 2025 पर्यंत सुमारे 30 लाख रुपये पाठवले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !