पुण्यात भीषण अपघातानंतर वाहनांनी घेतला पेट : नऊ जणांचा मृत्यू


Vehicles catch fire after horrific accident in Pune: Nine people die पुणे (13 नोव्हेंबर 2025) : ब्रेक फेल झालेला कंटेनर इतर वाहनांवर आदळून कारवर आदळल्यानंतर सीएनजीचा स्फोट घडल्यानंतर तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. अपघातांतन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले पुलावर तातडीने पोहोचल्या. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय घडले पुण्यात ?
समजलेल्या माहितीनुसार कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानंतर तो अन्य वाहनांवर धडकला व त्यानंतर एका कारवर धडकल्यानंतर सीएजीचा स्फोट होवून आग लागली. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंटेनरचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या कंटेनरने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकले असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता, त्या ट्रकने 20-25 वाहनांना धडक दिली आहे. पंचनामा सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !