पुणे हादरले : व्यावसायीकाची मित्रांनीच केली गोळ्या झाडून हत्या


Pune shaken: Businessman shot dead by his friends पुणे (14 नोव्हेंबर 2025) :  व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून हत्या केल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी समोर आला. बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी व्यावसायिकाला गोळी घालून ठार केले, त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला आणि कार घेऊन पसार झाले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे.

आधी कारमध्ये चर्चा नंतर खून
नितीन शंकर गिलबिले (वय 38, रा. वडमुखवाडी, चहोली) असे मयत व्यावसायीकाचे नाव आहे. जमीन-खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बसून बोलत होते. त्याच वेळी वैयक्तिक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला.



सीसीटीव्ही फुटेजनुसार, काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्या धक्क्याने निपचित पडलेले नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाच आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते.

ही घटना समजताच दिघी पोलिस आणि क्राइम ब्रँचची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक तपासात आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांची नावे समोर आली आहेत. नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !