आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत न्हावीतील शेकडो कार्यकर्त्यांचात भाजपात प्रवेश
Hundreds of workers from Nhavi join BJP, trusting in the leadership of MLA Amol Javale न्हावी, ता.यावल (14 नोव्हेंबर 2025) : रावेर मतदारसंघात आमदार अमोल जावळे यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांवर विश्वास व्यक्त करत न्हावी येथील उबाठा आणि काँगे्रसमधील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी शुक्रवारी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात भाजपमध्ये प्रवेश केला.
यांनी केला प्रवेश
या प्रवेश सोहळ्यात न्हावीचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच चेतन इंगळे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, महादेव मंदिराचे अध्यक्ष वामन नेहते, विकास सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर झोपे, मल्टी सहकारी सोसायटीचे संचालक विलास चौधरी, तसेच डिगंबर गाजरे, वामन तायडे, नेमिदास भंगाळे, चेतन झोपे, सोनू झोपे यांच्यासह काँग्रेस व उबाठा पक्षातील अनेक पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रवेश केला.


या मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे न्हावी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपची संघटनात्मक ताकद आणखी बळकट झाली आहे. सहभागी नागरिकांनी आमदार अमोल जावळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास असल्यानेच हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
प्रसंगी हिरालाल चौधरी, शरद दादा महाजन , हर्षल पाटील, नरेंद्र नारखेडे, नारायण चौधरी, गणेश नेहते, भास्कर पिंपळे, उमेश बेंडाळे, भरत पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.







