भाजपाचे तिकीट मिळाल्यास रावेर मतदारसंघाचा कायापालट करणार


डॉ.निलेश महाजन यांचा विश्‍वास : पक्षश्रेष्ठींची भेट घेणार

भुसावळ : रावेर विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे उमेदवारी मिळाल्यास मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असणार असल्याचा विश्‍वास प्रसिद्धी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.निलेश महाजन यांनी व्यक्त केला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ.महाजन म्हणाले की, रुग्णसेवेच्या माध्यमातून आपली सेवा सुरू असून शासनाच्या विविध योजनांचा लाभही आपण जिल्ह्यातून सर्वाधिकरीत्या मिळवून दिला आहे. भाजपाने आपल्या तिकीट द्यावे, अशी आपली इच्छा असलीतरी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला शिरसावद्य राहील व त्याप्रमाणे आपण काम करू, असे ते म्हणाले. मतदारसंघाच्या व्हिजनबाबत ते म्हणाले की, केळीचा बेल्ट असलेल्या प्रदेशातील केळीवर प्रक्रिया करणारे मोठे उद्योग आणणे, शिक्षण, बेरोजगारी आदी मुद्दे आपल्या विकास अजेंड्यावर असतील, असेही ते म्हणाले मात्र भाजपाने तिकीट दिल्यानंतर आपली उमेदवारी असेल, अपक्ष वा अन्य कुठल्याही पक्षाकडून आपण निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले.


कॉपी करू नका.