भुसावळातील प्रभाग क्रमांक ‘14 ब’ च्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी : अंकिता खोले-पाटील
My candidacy for the overall development of Ward No. ‘14 B’ in Bhusawal : Ankita Khole-Patil भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या निवडणूक आखाड्यात प्रभाग क्रमांक 14 ब मधून भाजपाने समाजसेवक व हॉटेल चालक सारंगधर पाटील यांच्या स्नुषा अंकिता खोले-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अलीकडेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज सादर केला व अर्ज मंजुरीनंतर प्रभागात प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. प्रभागातील जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी अंकिता खोले-पाटील म्हणाल्या.
पक्ष श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवणार !
‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने अंकिता खोले-पाटील यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नम्रपणे सांगितले की, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपा पक्षातील सर्वच श्रेष्ठी तसेच माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळाली असल्याने प्रथम मी त्यांचे आभार मानले. भाजपा पक्ष श्रेष्ठींनी आपल्याला उमेदवारी दिल्याने निश्चितपणे आपण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असून प्रभागाच्या विकासाचे व्हिजन घेवून आपण मतदारांसमोर जाणार असून निश्चितपणे मतदारांकडून आपल्याला कौल मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पतीसह सासरे गुंतले प्रचारात
तरुण व उच्चशिक्षित असलेल्या अंकिता राजेंद्र खोले-पाटील या समाजसेवक व हॉटेल खालसा पंजाबचे संचालक सारंगधर पाटील (छोटू भाऊ) यांच्या स्नुषा तर भाजयुमो पदाधिकारी मनीष सारंगधर पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत. पत्नीचा तसेच सुनेचा विजय होण्यासाठी पिता-पूत्रांचा प्रभागातील मतदारांशी गेल्या अनेक वर्षांपासून संपर्क आहे शिवाय निवडणुकीच्या निमित्ताने उभयंतांनी पुन्हा प्रभागात संपर्क वाढवत मतदारांच्या गाठी-भेटी वाढवल्या आहेत. जनता जनार्दनाचा आशीर्वाद निश्चितपणे लाभेल, असे प्रसंगी सारंगधर पाटील व मनीष पाटील यांनी सांगितले.


