भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिन
भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात बुधवार, 19 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, परीक्षक म्हणून विद्यालयातील शिक्षक श्री.श.चिपळूणकर उपस्थित होते.

जान्हवी पाटील हिने राष्ट्रीय एकात्मता दिना संदर्भात वक्तृत्व सादर केले. विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थ्यांनी वादविवाद स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.पी.पाठक व श्री.श.चिपळूणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक भाग्यश्री जगताप, द्वितीय क्रमांक सिद्धेश अत्तरदे, तृतीय क्रमांक योगिनी भिरूड तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थी यांना बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन मनिष मावळे तर आभार रीता महाजन मॅडम यांनी मानले. संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, बी.बी.जोगी, टी.एल.नेमाडे यांची उपस्थिती होती.


