भुसावळात 23 रोजी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी
भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार शहरात 19 वर्षाआतील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जळगाव जिल्हा मुले / मुलींचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार, 23 रोजी दुपारी 2.00 वाजता सेंट अलॉयसीस शाळेच्या मैदानावर, भुसावळ येथे होणार आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा नंदुरबार येथे 5 ते 7 डिसेंबर दरम्यान होणार आहे. निवडलेले विद्यार्थी जळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करतील. 30 नोव्हेंबर 2004 नंतर जन्मलेले खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र असतील. इच्छुकांनी सोबत आधार कार्ड व जन्म दाखला आणावा तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट गणवेशात यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असो. चे जिल्हा सचिव वासेफ पटेल व क्रीडा शिक्षक मेघशाम शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



