कर्माला व ज्ञानाला भक्तीची जोड नसल्यास भक्तीयोग नाही : किरण पांडे


भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : शहरताील श्री ज्ञानेश्वर माऊली सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळातर्फे 17 ते 17 नोव्हेंबर दरम्यान श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या सोहळ्यातील , माझिया भजनी प्रेम धरी …या विषयावर प्रवचन करतांना वक्ते किरण पांडे म्हणाले की, ज्ञानेश्वरित भक्तीचा महिमा मोठ्या प्रमाणात विषद करण्यात आलेला आहे. कर्माला व ज्ञानाला भक्तिची जोड़ असल्यशिवाय त्याचा भक्तियोग तयार होत नाही. भक्ती ही सहज सुलभ व सोपी असते. गोपिकांची भक्ती ही आदर्श भक्ती मानली जाते, असे विचार त्यांनी मांडले.

कार्तिक कृष्ण 13 ला माऊलीनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली आहे. त्यानिमित्त देवेंद्र जोशी यांचे काल्याचे कीर्तन होऊन काल्याचा प्रसाद वितरीत करण्यात आला. भुसावळात परंपरा गेल्या 80 वर्षांपासून अखंडपणे अविरत सुरू आहे. ही भुसावळ शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. भुसावळकरांचे ज्ञानेश्वर माऊली विषयींचे प्रेम यातून प्रगट होते. याशिवाय सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजता ज्ञानेश्वरांच्या समाधी काळाचे अभंग वाचन रमेश जोशी यांनी केले.

या सर्व सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष भानुदास पाटील, उपाध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव प्रा.डॉ.रमेश जोशी, एफ.आर.पाटील, राजेंद्र देवभानकर, दिलीप झोपे, नीळकंठ बढे, संजय फिरके, रत्नाकर केर्‍हाळकर, मनोहर महाजन यांनी आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !