भुसावळ पालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुनेच्या विजयासाठी कुटूंबच रणांगणात


भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळात भाजपाने प्रभाग क्रमांक 14 ब मधून समाजसेवक व हॉटेल पंजाब खालसाचे संचालक सारंगधर पाटील यांच्या सुनबाई अंकिता खोले-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या सारंगधर पाटील उर्फ छोटू भाऊ यांच्यासह परिवारातील सदस्यांनी सुनबाईच्या विजयासाठी कंबर कसत आता मतदारांच्या गाठी-भेटी वाढवत प्रचार सुरू केला आहे.

सामाजिक कार्यामुळे छोटूभाऊंना जनतेचा आशीर्वाद
भुसावळातील हॉटेल व्यावसायीक केवळ ही ओळख न ठेवता छोटू भाऊ पाटील यांनी सेवाभावी कार्यातून समाजसेवी कार्याचा वसा अविरत सुरू ठेवल्याने जनतेत त्यांची मोठी लोकप्रियता आहे. कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला तरी घरी जाण्यासाठी अनेकांकडे पैसे नसताना सारंगधर पाटील यांनी दातृत्वाचा झरा आटू दिला नाही. दहा हजारांवर लोकांना त्यांनी मोफत जेवण दिले. समाजसेवा एव्हढ्यावर थांबेल ते सारंगधर पाटील कसले ! त्यांनी पदरमोड करीत घराकडे निघालेल्या अनेक वाटसरूंना भाड्यासाठी पैसे दिले शिवाय काहींना घरपोच जाण्यासाठी वाहनाची मोफत व्यवस्थाही करून दिली. त्यांच्यातील हीच सेवाभावी वृत्ती लोकांना भावली व त्यानंतर ते नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनले.



सुनेसाठी कुटूंब उतरले रिंगणात
भुसावळातील रहिवासी असलेल्या पाटील दाम्पत्याचा थोरला मुलगा मनीषने अलीकडेच रजिस्टर पद्धत्तीने विवाह केल्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी अंकिता खोले-पाटील या भुसावळच्या रहिवासी झाल्या. पाटील कुटूंबाचे सामाजिक कार्य व भाजपा पक्षावरील प्रेम व निष्ठा पाहता मंत्री संजय सावकारे, पक्ष श्रेष्ठींनी पाटील कुटूंबातील सुनबाईला प्रभाग 9 ब मधून भाजपातर्फे अधिकृतरित्या उमेदवारी दिली आहे व सुनबाईच्या प्रचारार्थ आता कुटूंबानेही रिंगणात उडी घेत प्रचार सुरू केला आहे.

जनतेचे आशीर्वाद लाभणार : अंकिता खोले-पाटील
भाजपा पक्ष श्रेष्ठींनी आपल्याला उमेदवारी दिल्याने निश्चितपणे आपण आयुष्यभर पक्षाचे व सर्व पक्ष श्रेष्ठींचे ऋणी राहू. प्रचारात पतीसह सासर्‍यांची खंबीर व मोलाची साथ लाभली असून जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे आपल्याला मिळेल, असा आशावाद प्रभाग 9 ब च्या उमेदवारी अंकिता खोले-पाटील यांनी व्यक्त केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !