दुचाकी चोरी प्रकरणातील पोलिसांच्या हातावर तुरी देणारे आरोपी अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात


The accused who evaded the police in the bike theft case is in the net of Amalner police अमळनेर (21 नोव्हेंबर 2025) : दुचाकी चोरी प्रकरणातील दोन आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होहता. अमळनेर पोलिसांनी शोध मोहिमेनंतर दोघांना अटक केली आहे. हिम्मत रेहंज्या पावरा (32) आणि अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खरडे (27, रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पसार
दोघे सराईत चोरटे काही दिवसांपूर्वी मोटारसायकल चोरीप्रकरणी पकडण्यात आले होते. पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली व जळगाव कारागृहात जागा नसल्याने त्यांना नंदुरबार कारागृहात हलविण्याचे आदेश असल्याने पोलिस कर्मचारी अमोल पंडित करडईकर व यशकुमार रवींद्र सपकाळे हे नंदुरबारकडे जात असताना धावडे गावाजवळ अचानक अंबादासने तब्येत बिघडल्याचे नाटक करत डोळे मिटले. पोलिसांनी हॉटेल नयनजवळ वाहन थांबवून पाणी आणल्यावर, बेडी काढल्याची संधी साधत तो झटका देत पळाला. त्याचक्षणी शेजारी बसलेला हिंमत पावरा देखील बेडीसकट धावत शेतात पसार झाला.



गोपनीय माहितीवरून अटक
अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तत्काळ विशेष पथके तैनात केली. हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे, सुनील तेली, भूषण परदेशी, अमोल करडईकर आणि मयूर पाटील यांच्या पथकांनी तीन दिवस सलग जंगलात शोध मोहिम राबवली. अंबादासचे नातेवाईक ताब्यात घेऊन चौकशी सुरू असताना तो रंजाणे गावातील बहिणीकडे लपल्याचे समोर आले. पहाटेच सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, दुसरा आरोपी हिंमत पावरा हा शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील एका हॉटेलवर असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धडक दिली व त्यालाही तेथून जेरबंद केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !