भाजपा पदाधिकार्‍यांच्या वाहनात रोकड सापडली : निलेश राणेंचा पोलिस ठाण्यात ठिय्या


मालवण (2 डिसेंबर 2025) : मालवण नगरपरिषद निवडणुकीचा चांगलाच तापलेला दिसून येत आहे. सोमवारी मध्यरात्री नाकाबंदीत थांबवण्यात आललेया कारमध्ये दीड लाखांची रोकड सापडल्याने वादाला तोंड फुटले. ही कार भाजपा स्थानिक पदाधिकार्‍याची असल्याने शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि निलेश राणे यांनी यानंतर भाजपकडून पैसे वाटप सुरू केल्याचा आरोप केला तर राणे यांनी पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण प्रचंड तापले आहे.

नाकाबंदीत आढळली रोकड
मालवणमध मध्यरात्री नाकाबंदीत मालवण पोलिसांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या गाडीत रोख रक्कम पकडली. 10 वाजता प्रचार संपल्या मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकार यांच्या एम.एच.07 ए.एस.6960 या कार मध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. मालवण पोलिसांनी वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलिसात आणल्यानंतर मालवण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलिस ठाण्यात येऊन सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर शिवसेनेचे आमदार निलेश राणे मालवण पोलिस ठाण्यात तळ ठोकला व गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

एका पांढर्‍या कारमध्ये पोलिसांच्या पथकाला ही रोकड आढळून आली. भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. मी पालिस ठाण्यात जाईपर्यंत पोलिसांनी तक्रारही दाखल केली नव्हती. हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !