उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले ; निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे !
Uddhav Thackeray clearly said; It is better not to talk about the Election Commission and the courts! मुंबई (2 डिसेंबर 2025) : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पालिका निवडणुकीतील मतमोजणी 21 डिसेंबर रोजी करण्याच्या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे सांगितले व निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशी प्रतिक्रियाही दिली.
शिंदेची किंमत संपली
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.
शिवसेनेच्या ठाकरे गटात मंगळवारी मुंबई व उपनगरातील शेकडो शिवसैनिकांचा प्रवेश झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयाचा निवडक शब्दांत खरपूस समाचार घेतला. निवडणूक आयोग व न्यायालय यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. आता केवळ पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहे, असे ते म्हणाले.


