मंत्री नीतेश राणे यांचे वादग्रस्त विधान ; पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत ?


Minister Nitesh Rane’s controversial statement ; Why don’t environmentalists oppose goat slaughter on Eid? मुंबई (5 डिसेंबर 2025)  : नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना कधीच दिसत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वादग्रस्त विधानाची चर्चा
नाशिकमध्ये 2027 साली सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळ्याला देशभरातील साधूसंत येणार आहेत. त्यांच्या वास्तव्यासाठी तपोवनात साधूग्राम तयार केले जाणार आहे. पण त्यासाठी तेथील तब्बल 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मंत्री नीतेश राणे यांनीही यासंबंधी अत्यंत आक्रमक भूमिका विषद केली आहे.



काय म्हणाले मंत्री नीतेश राणे?
तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा ते गप्प का? सर्व धर्म समभाव?, असे नीतेश राणे यांनी गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना नीतेश राणे यांनी हे विधान केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

काँग्रेसची नीतेश राणेंवर टीका
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या प्रकरणी नीतेश राणेंवर निशाणा साधला आहे. प्रत्येक गोष्टीत आपण काय करतो, काय करत नाही, पुढची पिढी आपल्याला काय म्हणाले? याचा विचार न करता मंत्रिपदावर बसून असे बेजबाबदार विधान करणे शोभते का? आपले मंत्रिपद व राजकारण टिकवण्यासाठीच नीलेश राणे असे बोलतात. तपोवनातील वृक्षतोडीचे कुणी समर्थन करत असेल तर त्याचा अर्थ त्याला आपल्या पुढच्या पिढीची काळजी नाही. त्याला फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचे आहे.

नाशिकमध्ये यापूर्वी कुंभमेळा झाला नाही का? शेकडो वर्षांपासून तिथे कुंभमेळा होत आहे. तेव्हा झाडे तोडण्याची गरज पडली नाही. मग आत्ताच का झोडे तोडली जात आहेत? असा सवालही अतुल लोंढे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !