शनेश्वर देवस्थान ट्रस्ट बनावट अॅप प्रकरण : दोन कर्मचार्यांना बेड्या
अहिल्यानगर (6 डिसेंबर 2025) : शनेश्वर देवस्थान ट्रस्टमधील बनावट अॅप प्रकरणी दोन कर्मचार्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार अशी आरोपींची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट अॅप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणांमध्ये अनेक कर्मचार्यांची नावे समोर आली. यातील दोन कर्मचार्यांना अटक करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वतः याबाबत फिर्याद दिली. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. सायबर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. आणखी काही कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आहेत.









