भुसावळातील प्रौढाला गुंतवणुकीच्या आमिषाने 19 लाखांचा गंडा
भुसावळ (6 डिसेंबर 2025) : ऑनलाईन गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून भुसावळातील प्रौढाला 19 लाख एक हजार 999 रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी जळगावातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
नत्थू प्रसाद प्रजापती (49, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार के.स्ट्रॅटेजी क्लब आणि धोरणात्मक व्यापार गट या नावाने चालणार्या ऑनलाइन ट्रेडिंग गटात त्यांना सहभागी करण्यात आले. गटातील प्रीती यादव, निता जैन या दोन महिलांनी तसेच गटाचा परदेशी अॅडमिन अॅडम सॅम्निओटीस या व्यक्तीने विविध क्रमांकावरून संपर्क साधला. तसेच शेअर मार्केटिंगमध्ये अधिक नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले. या आश्वासनांवर विश्वास ठेवत प्रजापती यांनी 9 ऑगस्ट ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईन 19 लाख रुपये पाठवले, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा नफा मिळाला नाही.









