कॅफेआड सुरू होते अश्लील प्रकार : पोलिसांच्या धाडीनंतर धक्कादायक बाबी समोर
कोल्हापूर (6 डिसेंबर 2025) : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ मध्ये अश्लील प्रकार चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने छापेमारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पथकाला जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रुम आणि विशेष म्हणजे 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी छापा मारल्यानंतर कारवाईदरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण-तरुणींची एकच धांदल उडाली. काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









