मंत्री गिरीश महाजनांची स्पष्टोक्ती : तपोवनातील मोठी झाडे तोडली जाणार नाहीत


नाशिक (6 डिसेंबर 2025) : नाशिकमधील कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवनातील मोठी झाडे तोडली जाणार नसल्याचे स्पष्ट करीत ाशिककरांची भावना तीच आमची भावना असल्याचे सांगत एक्झिबिशन सेंटरची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोठी झाडे लावणार
तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात पर्यावरणप्रेमी आणि संघटना आक्रमक झाल्यानंतर मंत्री महाजन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही झाडांच्या बदल्यात मोठी झाडे लावणार आहोत. तज्ज्ञांना घेऊनच सर्व काम होईल, एकही मोठे झाड आम्ही तोडणार नाही. छोटी झाडे उचलून दुसरीकडे लावू. 700 झाडे हलवली जातील, पण 15 हजार नवीन झाडे लावली जातील. ही सर्व झाडे देशी प्रजातीची असून राजमुद्रा येथून 15 फूट उंच झाडे मागवली जाणार आहेत.



सीएसआर निधीतून उद्योगपतींच्या मदतीने हा उपक्रम राबवण्याचे नियोजन असून एका झाडामागे जवळपास 1400 रुपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव
नगरपरिषद निवडणुकांपासून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आता शिंदेसेनेने जाहीर विरोध दाखवला असून वृक्षतोडीविरोधात आंदोलन केले आहे. दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनीही पर्यावरण जपणे महत्त्वाचे असे सांगून वृक्षतोडीला विरोध असल्याची भूमिका जाहीर केली. एकूणच राज्यात भाजपसोबत सत्तेत असणार्‍या शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !