छेडखानीला कंटाळून 13 वर्षीय विद्यार्थिनी आत्महत्या


13-year-old student commits suicide after being harassed अकोला (7 डिसेंबर 2025) : छेडखानीला कंटाळत सातव्या इयत्तेत शिकणार्‍या 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी घडली. इयत्ता आठवीचा विद्यार्थी तिची सतत छेड काढत असल्याने विद्यार्थिनी सतत तणावात होती व तिने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल करताच छेड काढणार्‍या विधीसंघर्षग्रस्त मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली तर मुलाच्या वडीलांना अटक करण्यात आली.

खोलीत गेल्यावर लावला गळफास
विद्यार्थिनी दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करत बसते, असे सांगून ती स्वत:च्या खोलीत गेली. सायंकाळपर्यंत ती खोलीबाहेर आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला तिने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेतील एका अल्पवयीन मुलाकडून तिची छेड काढली जात होती, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.



दामिनी पथकाने कठोर उपाय करावेत : वडिलांची विनंती
माझ्या मुलीला तिच्याच शाळेतील आठवीतील मुलगा त्रास देत असल्याची माहिती ‘त्या’ मुलाच्या वडिलांना सहा महिन्यांपूर्वीच मी फोनवरून दिली होती. त्यानंतरही पाहिजे तसा धाक त्याच्यावर कुटुंबीयांचा नव्हता. संबंधित शाळेच्या शिक्षकांनाही महिनाभरापूर्वी याची कल्पना दिली होती. पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. आमची मुलगी गेली, हा धक्का कधीही भरून निघू शकत नाही मात्र भविष्यात शाळांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासनाने अधिक गांभीर्याने दखल घ्यावी, असा प्रकार यापुढे होऊ नये, यासाठी कठोर उपाय हवेत, ही माझी विनंती.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !