भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची करणार मागणी

हिवाळी अधिवेशन गाजणार : नियमबाह्य काम केल्याचा आरोप


BJP MLAs will demand Tukaram Mundhe’s suspension in the winter session नागपूर (8 डिसेंबर 2025) : राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी तुकाराम मुंढेंची ओळख असलीतरी एकाच पदावर ते फार काळ राहिल्याचा इतिहास नाही. त्याचत आजपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनात भाजपा आमदारांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांच्या थेट निलंबनाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हिवाळी अधिवेशन गाजणार !
नागपूर महानगरपालिकेतील त्यांच्या जुन्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय आता पुन्हा उकरून काढले जाणार असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.



प्रशासकीय काम करताना नियमावर बोट ठेवून काम करणार्‍या तुकाराम मुंढे यांची कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात एकाच पदावर जास्त काळ नियुक्ती झाली नाहीय. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते कोणत्याही सत्ताधार्‍यांना पंसत नसल्याचं दिसून येते. त्यामुळे ते जास्ती जास्त वर्षभर एका पदावर राहिलेत. आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांकडून तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजप आमदारांचे मुंढेंवरील आरोप काय?
तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, शासनाकडून अधिकृत नियुक्ती नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (उएज) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला होता, असा भाजपचा मुख्य आरोप आहे. या पदावर असताना त्यांनी आपल्या मर्जीतील काही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले तसेच काही महिला अधिकार्‍यांना दमदाटी केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत.

या दोन्ही प्रकरणी त्यावेळी पोलिसांत एफआयआर दाखल झाले होते मात्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा भाजपचा दावा आहे. आता ही प्रकरणे पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पटलावर मांडून त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे.

20 वर्षांत 24 बदल्यांचा ’विक्रम’
तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून गत 20 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 24 वेळा बदली झाली आहे. जो प्रशासकीय सेवेतील एक विक्रमच मानला जातो. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या ’डॅशिंग’ अधिकार्‍यासमोर नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !