भुसावळ महामार्गावर ड्रेन बुजवल्या ; अनधिकृत कटमुळे वाढले किरकोळ अपघात


भुसावळ (8 डिसेंबर 2025) : शहरातून गेलेल्या चाडेचार किलोमिटरच्या महामार्गावर अनेक समस्या समोर आल्या आहेत. मुख्य मार्ग व सर्व्हिसरोडच्या मधील ड्रेनेज लाइनचे खोदकाम केले जाते, मात्र शहरातून गेलेल्या महामार्गावर प्राधिकरणाने केलेले ड्रेनेज खोदकाम बुजविले गेले आहे. यासोबतच अनधिकृत कट तयार करण्यात आल्याने किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिसरोड व मुख्य मार्गात प्राधिकरणाकडून खोदकाम केले जाते. वाहने थेट रस्त्यावर येवू नयेत, यासाठी असलेली ही उपाययोजना मात्र कुचकामी ठरत आहे. शहरातील पुजा कॉम्पलेक्स, मुन्ना तेली पेट्रोल पंप, तवक्कल हॉटेल परिसर, आयोध्या नगर, जूना आयटीआय परिसर, वांजोळा रोड, सिंधी कॉलनीला जोडणारा मार्ग, खडका चौफुलीच्या दोन्ही बाजू, वरणगावरोडवाय पॉइंट, जळगावरोडवरील नवोद्य विद्यालय परिसर आदी ठिकाणी महामार्ग व सर्व्हिसरोडमध्ये प्राधिकरणाने खोदकाम केलेल्या ड्रेन विविध व्यवसायीकांनी बुजल्या आहेत. यामुळे वाहनांचा सताड वापर सुरु आहे. यातून किरकोळ अपघात वाढले आहेत. यासोबतच महामार्गावरील दुभाजकांमध्ये लोखंडी ग्रील नाहीत. यामुळे वाहनधारक फेरा वाचविण्यासाठी थेट दुभाजक ओलांडतात. महामार्गावरील रेल्वे उड्डानपूल तसेच खडका चौफुली परिसर असे तीन रस्ता अपघाताचा हॉटस्पॉट बनण्याच्या स्थितीत आहेत.



साकेगाव मार्गावरील नवोदय विद्यालय ते जय हॉटेल परिसरातही बॅरिकेटची चोरी झाली आहे. महामार्गाच्या कडेला होणारी पार्किंग, झेब्रा कॉसींग ऐवजी कोणत्याही भागात दुचाकी व पादचार्‍यांकडून रस्ता ओलांडणे, राँग साईडने वाहतूक, सर्व्हिसरोड ऐवजी बुजलेल्या ड्रेनमधून महामार्गावर वाहने चढविणे आदी प्रकार शहरातून गेलेल्या महामार्गावर सर्रास घडतात. यामुळे वाहनधारकांमध्ये प्रबोधनही आवश्यक आहे.

सुशोभिकरण करणे आवश्यक
शहरातील महामार्गाच्या वरणगाव, साकरी, खडका, नाहाटा, जळगाव वाय पॉइंट या अंडरपासच्या चौफुलीवर महामार्ग प्राधिकरणाने सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नाहीत. या उलट चौफुलींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. प्राधिकरणाने फुलझाडे व कुंड्या ठेवून सुशोभिकरण करणे आवश्यक आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !