कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या ‘अमृत निर्झर’ काव्यसंग्रहाचे धुळ्यात प्रकाशन


भुसावळ (8 डिसेंबर 2025) : भुसावळ येथील कवी ज्ञानेश्वर घुले यांच्या ‘अमृत निर्झर’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अहिराणी साहित्य परिषद, धुळे यांच्या वतीने धुळे येथे उत्साहात झाले.

अहिराणी साहित्य परिषद, धुळे आयोजित साहित्य पुरस्कार व पुस्तक प्रकाशन समारंभ देवपूर, धुळे येथील जिल्हा ग्रंथालय सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद पाटील (माजी आमदार, ग्रामीण धुळे) होते. तसेच मा. श्री अरुणभाई गुजराथी (माजी विधानसभा अध्यक्ष), साहित्यिक प्राध्यापक वा. ना. आंधळे, इतर मान्यवरांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.



समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जोशी (अमळनेर), संदीपजी चौधरी (नंदुरबार), संदीपजी घोरपडे (म.सा.प. पुणे शाखा, अमळनेर), संजय मुंदडा (कार्याध्यक्ष, राजवाडे संशोधन केंद्र, धुळे) आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.भगवान पाटील, उपाध्यक्ष प्रा.डॉ.फुला बागुल, कोषाध्यक्ष प्रकाश महाले, सचिव प्रभाकर शेळके, सर्व संचालक मंडळातील सदस्य तसेच विनोद कांदेले, दीपाली कांदेले उपस्थित होते. सूत्रसंचालन परिषदेचे संचालक रवींद्र वाणी यांनी केले.

धुळे जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने साहित्यिक, रसिक प्रेक्षक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !