यावल तालुक्यात तरुणाचा खून : गुन्ह्यात अॅट्रासिटीचे कलम वाढवले
Murder of a youth in Yaval taluka: Atrocity section added to the crime यावल (10 डिसेंबर 2025) : यावल शहरातून बोरावल जाणार्या रस्त्यावर पाटचारी जवळ जळगावच्या 19 वर्षीय तरुणाचा सोशल नेटवर्कवर व्हीडीओ टाकल्याच्या कारणावरून जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यात मंगळवारी अॅट्रासिटीचे कलम वाढवण्यात आले व या गुन्ह्याचा तपास देखील डीवायएसपी यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण?
शहरातून बोरावल जाणार्या रस्त्यावर पाटचारीच्या जवळ इंस्टाग्राम या सोशल नेटवर्कवर शिविगाळचा व्हिडिओ टाकल्याच्या रागातून तुषार चंद्रकांत तायडे (19, रा.बौद्धवाडा, समता नगर, जळगाव) या तरुणाची 2 डिसेंबर रोजी रस्ता अडवून मारहाण करीत हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात विक्रम पंडितराव सोनवणे (46), अविनाश उर्फ अविनाथ सुकलाल सोनवणे (22), विजय रूपचंद सोनवणे (27, तिघे राहणार सुजदे, ता.जि.जळगाव), निलेश पंडित कोळी (33, रा.बोरनार, जि.जळगाव) व कल्पेश निलेश इंगळे (21, रा.आसोदा, ता.जि.जळगाव) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. ते सध्या 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे.









