भुसावळात नाकाबंदी : 57 वाहनांवर दंडात्मक कारवाई
मतमोजणीपर्यंत दररोज नाकाबंदी ; 21 डिसेंबरपर्यंत वाहनधारक पोलिसांच्या रडारवर
Roadblock in Bhusawal : Penal action taken against 57 vehicles भुसावळ (11 डिसेंबर 2025) : भुसावळ शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू असलेल्या विशेष नाकाबंदी मोहिमेत नियमभंग करणार्या 57 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत शहरात दररोज नाकाबंदी सुरू राहणार असून 21 डिसेंबरपर्यंत वाहनधारक पोलिसांच्या विशेष निगराणीखाली राहणार आहेत.
महत्त्वाच्या चौकात नाकाबंदी
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या चौकांवर, मुख्य मार्गांवर आणि प्रवेशद्वारांवर वाढीव पथकांसह तपासणी सुरू केली आहे. परवान्याविना वाहनचालक, विमा नसलेली वाहने, विनापरवाना फेरफटका, हेल्मेट न घालणारे, तसेच नियमबाह्य रितीने केलेले बदल अशी विविध उल्लंघने आढळल्याने दंडाची कारवाई करण्यात आली.









