भुसावळात रेल्वे यार्डमध्ये अनोळखी तरुणाची आत्महत्या
ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांचे आवाहन
Railway police appeal for help in identifying the person भुसावळ (11 डिसेंबर 2025) : शहरातील रेल्वे यार्ड परिसरात झाडाला नायलॉनच्या दोरीने लटकलेला अनोळखी तरुण मृत अवस्थेत आढळला. ही घटना सोमवार, 8 रोजी सकाळी उघडकीस आली. ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून त्या तरुणास मृत घोषित केले.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे असून अंगावर करड्या रंगाचा हुडी स्वेटर, हिरवट पट्टे असलेला शर्ट आणि निळी जीन्स पँट आहे. मजबूत बांधा, उभट चेहरा आणि सुमारे साडेपाच फूट उंची आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक हणमंत पांचाळ करीत आहेत. रेल्वे पोलिसांनी मृताची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे. ज्यांना या व्यक्तीची माहिती असेल त्यांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन तपासाधिकारी पांचाळ यांनी केले आहे.









