भुसावळ पालिका निवडणूक : प्रभाग 4 व 11 मध्ये नऊ बुथवर 20 रोजी मतदान


Bhusawal Municipal Election: Voting will be held at nine booths in wards 4 and 11 on the 20th. भुसावळ (11 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीत अपिल दाखल केलेल्या प्रभागातील उमेदवारांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. यासाठी 9 बुथवर मतदान होणार आहे. आठ हजार 381 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

नऊ बुथवर होणार मतदान
पालिकेच्या प्रभाग 4 ब व 11 ब मध्ये 20 डिसेंबर रोजी होणार्‍या मतदानासाठी 9 बुथवर मतदान होणार आहे. 8 हजार 381 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. प्रभाग चारमधील उमेदवार अशोक चौधरी यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने उमेदवार परीक्षीत बर्‍हाटे यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला. यामुळे आता प्रभाग 4 ब मध्ये मतदान होणार नाही, यामुळे येथे नियुक्त केलेल्या 24 कर्मचार्‍यांच्या मतदान प्रक्रियेतील ऑर्डर रद्द करण्यात आली. या प्रभागात तीन हजार 681 मतदार होते. प्रभाग 5 ब मध्ये काय होते, याकडे राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह मतदारांचे लक्ष लागले होते.



आता केवळ दोन प्रभागात निवडणूक
आता प्रभाग 4 ब आणि प्रभाग 11 ब यामध्ये निवडणूक होणार आहे. प्रभाग 4 ब मध्ये दोन बुथवर मतदान होणार असून येथे एक हजार 562 मतदार आहे तसेच प्रभाग 11 ब मध्ये 7 बुथवर मतदान होईल. येथे सहा हजार 818 मतदार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक अधिकारी तथा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची तयारी अंतीम टप्यात आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !