साकळीत उद्या उरुसानिमित्त कव्वाली सोहळा


यावल (15 डिसेंबर 2025) : यावल तालुक्यातील साकळी येथील प्रसिद्ध आणि सर्वधर्मीय श्रद्धेचे केंद्र असलेल्या हजरत सजनशाह वली रहेमतुल्लाअलै यांच्या पवित्र उरूस निमित्ताने 15 डिसेंबर रोजी संदल मिरवणूक निघाली. मंगळवार, 16 डिसेंबर रोजी भव्य कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्य सैय्यद अशफाक शौकत तसेच त्यांच्या सहकार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

असे असतील पाच रविवार उर्स शरीफ
येथे संदल शरीफ व कव्वाली नंतर पहिला उर्स शरीफ 21 डिसेंबर रोजी असून दुसरा 28 डिसेंबर, तिसरा 4 जानेवारी 2026, चौथा उर्स शरीफ 11 जानेवारी तर शेवटचा पाचवा उर्स शरीफ हा दिनांक 18 जानेवारी रोजी राहणार आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !