भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीचे राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत यश
भुसावळ (15 डिसेंबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी संस्कृती मनोज मेढे हिने 17 वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल डॉ.तालीमेरेन जूनियर्स गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशिप 2025-26 दिमापुर नागालँड येथे झालेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.
अंतीम सामन्यात मिळवले यश
महाराष्ट्र टीमने मिझोरम या टीम सोबत पहिली मॅच 3/3 ने टाय केली.आणि दुसरी मॅच ही मध्य प्रदेश टीम सोबत 2/0 ने बाद केली आणि तिसरी मॅच ही हिमाचल प्रदेश ला 14/0 ने बाद केले. त्यानंतर महाराष्ट्र टीम ही सेमी फायनलला पोहोचली.सेमी फायनल मध्ये पंजाब या टीमला महाराष्ट्र टीम ने 2 /0 ने बाद करुण महाराष्ट्राची टीम ही फायनलला पोहोचली. त्यानंतर महाराष्ट्र टीमही फायनल ला पोहोचून त्यांची मॅच ही उत्तर प्रदेश या टीम सोबत झाली. महाराष्ट्र टीमने उत्तर प्रदेशला 1/4 पॉईंटने हरवून महाराष्ट्र टीमने सुवर्ण पदक प्राप्त केले.









