भुसावळात लेवा पाटीदार समाजाचे विशेष युवक-युवती परिचय संमेलन 28 रोजी


भुसावळ (16 डिसेंबर 2025) : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील विवाह इच्छुक युवक-युवतींसाठी जळगाव जिल्हा विशेष परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवारी 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता संतोषी माता हॉल येथे होणार आहे.

या परिचय संमेलनात जळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक युवक-युवतींचे हवेसे स्थळ जळगाव जिल्ह्यातील असावे,अशी अट आहे.तसेच जळगाव जिल्ह्यात खाजगी कंपनी, निमशासकीय अथवा शासकीय सेवेत कार्यरत असलेले युवक-युवती, लघुउद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, डॉक्टर, वकील तसेच विविध प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर यांना सहभागी होता येणार आहे. समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी या परिचय संमेलनाचा लाभ घ्यावा,यासाठी लेवा युवा.डॉट.कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील व उपाध्यक्ष राजेश सु. चौधरी यांनी केले आहे. या संमेलनासाठी मोफत नाव नोंदणीची अंतिम मुदत ही 18 डिसेंबरपर्यत आहे. त्यानंतर नोंदणी स्वीकारली जाणार नाही, असे आयोजकांनी कळविले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !