ऑनलाईन प्लॅट शोधताना यावलच्या महिलेला अडीच लाखांचा गंडा


A woman from Yawal was defrauded of ₹2.5 lakh while searching for a flat online यावल (16 डिसेंबर 2025) : ऑनलाईन फ्लॅट शोधताना यावल तालुक्यातील एका गावातील महिलेला भामट्याने दोन लाख 38 हजार 319 रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. सोमवारी या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
चितोडा गावातील कल्याणी नितीन महाजन (29) या महिलेने 6 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान ‘नो ब्रोकर’ नावाच्या ऑनलाइन अ‍ॅपवर फ्लॅट शोधण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान, ‘रमाकांत कुमार’ असे नाव सांगणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. या भामट्याने कल्याणी महाजन यांचा विश्वास संपादन केला. फ्लॅटचे बुकिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. फ्लॅटचे टोकन अमाउंट, डिपॉझिट तसेच ‘परत मिळणारी रक्कम’ असल्याचे सांगत, आरोपीने महाजन यांच्या बँक खात्यातून एकूण दोन लाख 38 हजार 319 रुपये स्वतःच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सपर केले.





अज्ञाताविरोधात गुन्हा
पैसे ट्रान्सपर केल्यानंतरही फ्लॅटचे बुकिंग न झाल्याने आणि संबंधित व्यक्तीशी संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे कल्याणी महाजन यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने यावल पोलिसात तक्रार दिल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !