‘एपस्टाइन फाईल्स’ 19 रोजी खुली होणार : पृथ्वीराज चव्हाणांच्या ‘त्या’ दाव्याने उडवली खळबळ


‘Epstein Files’ to be opened on the 19th : Prithviraj Chavan’s ‘that’ claim has created a stir मुंबई (17 डिसेंबर 2025) : कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित दशके जुने सरकारी रेकॉर्ड ट्रम्प प्रशासन 19 डिसेंबर रोजी जाहीर करणार असल्याने जगभराचे याकडे लक्ष लागले आहे. एपस्टाईनच्या प्रकरणाशी संबंधित सर्व ईमेल, फोटो आणि कागदपत्रे सार्वजनिक करण्यात येणार असून या नेटवर्कमध्ये अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात होते आणि जगातील अनेक शक्तिशाली लोक त्यात सामील होते, असा आरोप आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टाईनच्या प्रकरणाशी संबंधित वक्तव्य करीत 19 रोजी देशाचा पंतप्रधान बदलला जाईल, असा दावा केल्याने हा दावा कितपत खरा ठरणार? याकडेही देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

काय आहे चव्हाणांचा दावा
पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की, जेफ्री एपस्टाइन या व्यक्तीने जगातील अनेक बड्या आसामींना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या. या प्रकरणाच्या फाईल्स आता अमेरिकन संसदेत खुल्या होणार आहेत. या यादीमध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांचा आणि बड्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय राजकारणात भूकंप होईल आणि त्यामुळेच देशाचा पंतप्रधान बदलला जाईल, असा तर्क चव्हाण यांनी मांडला आहे. आपण बोलत असलेली माहिती अमेरिकेच्या संसदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नागपूरातील व्यक्ती पंतप्रधानपदी ?
पंतप्रधान बदलल्यानंतर नागपूरशी संबंधित व्यक्ती या पदावर बसेल, या आपल्या जुन्या दाव्यावर चव्हाण आजही ठाम आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. जेफ्री एपस्टाइनने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशयही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे तसेच भारतातील काही राजकारण्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झार्लों अशी चर्चा अमेरिकेत सोशल मीडियावर सुरू आहे त्यामध्ये काही आजीभमाजी खासदार आहेत, यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

एपस्टाइन फाईल प्रकरण काय आहे?
जगभरात गाजलेले ‘एपस्टाइन प्रकरण’ हे हाय-प्रोफाईल गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे एक अत्यंत गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची सुरुवात 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये झाली, जेव्हा एका 14 वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. मसाजच्या बहाण्याने मुलीला जेफ्री एपस्टाइनच्या आलिशान बंगल्यावर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा हा गंभीर आरोप होता. या तक्रारीनंतर हळूहळू 50 हून अधिक पीडित मुलींनी धर्य करून पुढे येत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आणि एपस्टाइनचे प्रकरणाचे पितळ उघडे पडू लागले.

बड्या सेलिब्रेटींची वाढू शकते अडचण
जेफ्री एपस्टाईनच्या इस्टेटने प्रसिद्ध केलेल्या 19 छायाचित्रांमध्ये नऊ प्रमुख सेलिब्रिटींची नावे आहेत. जरी या प्रतिमा थेट कोणालाही दोषी ठरवत नसल्या तरी त्या एपस्टाईनसोबत दाखवतात, ज्यामुळे वाद आणि प्रश्न निर्माण होतात.

डोनाल्ड ट्रम्प (अमेरिकेचे अध्यक्ष)
बिल क्लिटंन (माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष)
बिल गेट्स (अब्जाधीश)
प्रिन्स अँड्र्यू (ब्रिटिश राजाचा भाऊ)
स्टीव्ह बॅनन (ट्रम्पचे माजी सल्लागार)
लॅरी समर्स (हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष)
वुडी ऍलन (चित्रपट निर्माते)
रिचर्ड ब्रॅन्सन (उद्योजक)
अ‍ॅलन डेरशोविट्झ (प्रसिद्ध वकील)

92 फोटो प्रसिद्ध
जगातील सर्वात हाय-प्रोफाइल सेक्स स्कँडल ‘एपस्टाइन केस’शी संबंधित 92 फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी 3 फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आहेत. एका फोटोमध्ये ते अनेक मुलींनी वेढलेले दिसत आहेत तर दुसर्‍या फोटोमध्ये ते कंडोमच्या पॅकेटवर दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की 19 डिसेंबर रोजी एपस्टाइन केसशी संबंधित सर्व कागदपत्रे, ईमेल आणि फोटो प्रसिद्ध होऊ शकतात त्यामुळे आता 19 तारखेला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले दावे खरे ठरतात का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !