भुसावळातील 55 वर्षीय प्रौढाची आत्महत्या
A 55-year-old man from Bhusawal committed suicide भुसावळ (18 डिसेंबर 2025) : शहरातील गौसिया नगरातील शे. रशिद शे. कालू (वय 55) यांनी सल्फ्यूरिक अॅसीडचे सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, 16 रोजी घडली. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शे.रशीद यांची प्राणज्योत मालवली. आत्महत्येचे स्पष्ट कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार
शहरातील गौसीया नगरातील रहिवासी शेख रशीद शेख कालू यांनी मंगळवारी चार वाजता सल्फ्यूरिक अॅसीड सेवन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील डॉ. मानवतकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.









