विजेची मागणी वाढताच दीपनगर केंद्रातील बंद संच अखेर कार्यान्वित

960 मेगावॅट विजेचा राज्याला होतोय पुरवठा


As the demand for electricity increased, the closed unit at the Deepnagar power plant was finally put into operation भुसावळ (18 डिसेंबर 2025) : अवकाळी पाऊस व थंडीचे प्रमाण वाढल्याने राज्याची वीज मागणी कमी झाल्याने दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 210 व 500 मेगावॅटचे संच बंद करण्यात आले होते मात्र आता मागणी वाढत असल्याने 500 मेगावॅट क्षमतेचे दोन्ही बंद संच पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. 210 मेगावॅटचा संच क्रमांक तीन अद्याप बंद असल्याने दीपनगर औष्णिक केंद्रातून राज्याला 960 मेगावॅट विजेचा पुरवठा केला जात आहे.

मागणीअभावी संच बंद
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन तसेच 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक पाच वीज मागणी नसल्याने बंद करण्यात आले होते. 500 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक चारच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचे काम झाल्यानंतरही हा संच बंद होता मात्र आता राज्याची वीज मागणी वाढत आहे. गेल्या काळात यामुळे 1210 मेगावॅट विजेची निर्मिती ठप्प झालेली विजेची निर्मिती संच कार्यान्वित झाल्याने पुन्हा सुरू करण्यात आली. अवकाळी पावसानंतर जमिनीत ओलावा होता. यामुळे राज्यभरात रब्बीची पेरणी झाली. आता रब्बीच्या हंगातील पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी कृषी क्षेत्रातून वीजेची मागणी वाढत आहे. थंडीचाही जोर कमी अधिक होत असल्याने घरगुती क्षेत्रातूनही विजेची मागणी वाढत असल्याने मागणी वाढत असल्याने बंद असलेले संच कार्यान्वित केले जात आहेत.



पुढे काय? पुन्हा मागणी वाढेल
आगामी काळात रब्बी हंगामासाठी कृषी क्षेत्रातून विजेची पुन्हा मागणी वाढणार आहे. यामुळे केवळ मागणी नसल्याने बंद केलेले अर्थात झिरो लोड केलेले संच सुरू केले जातील. यासोबतच 660 मेगावॅट प्रकल्पातूनही पुर्ण दाबाने विजेची निर्मिती होऊ शकेल. जुना 210 मेगावॅट क्षमतेचाही संच आगामी काळात सुरू होण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !