जळगाव जिल्ह्यात 16 ते 30 डिसेंबर दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी


Prohibitory orders have been issued in Jalgaon district between December 16 and 30 जळगाव (18 डिसेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी तसेच ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

हे प्रतिबंधात्मक आदेश मंगळवार, 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.01 वाजेपासून ते 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशान्वये शस्त्र बाळगणे, स्फोटके, धोकादायक वस्तू वापरणे, प्रतिमा दहन, पाचपेक्षा जास्त लोकांची जमावबंदी, बेकायदेशीर सभा-मिरवणुका यावर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ व धार्मिक मिरवणुका तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तीना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, त्यांना हा आदेश लागू राहणार नाही, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !