डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात व्हाइट कोट समारंभ उत्साहात
The White Coat Ceremony was held with great enthusiasm at Dr. Gunwantrao Sarode Ayurveda College. जळगाव (20 डिसेंबर 2025) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट व डीन अॅड्रेस समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना व्हाइट कोट प्रदान करण्यात आला.
डॉ. केतकी पाटील सभागृहात झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत साळुंके, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, आयुर्वेद महाविद्यालयाचे रजीस्ट्रार चेतन चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


समारंभाच्या सुरूवातीला डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्हाइट कोट घालून गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी हा समारंभ विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये नवा अध्याय सुरु करणार असूना उज्ज्वल भविष्याच्या ध्येय आयुर्वेदिक शिक्षण, संशोधन व आरोग्यसेवा या क्षेत्रात उच्चस्तरीय गुणवत्ता प्रदान करत विद्यार्थी व समाजासाठी चांगले आयुर्वेदाचार्य देणारा ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आयुर्वेद हा प्राचीन काळापासून अखंड भारताचा कणा असल्याचे सांगितले. विदयार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासत या क्षैत्रात नाव उज्ज्वल करावे असे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्यात.







