खुर्ची व सत्ता हवी असती तर भाजपसोबत गेलो असतो ! : आदित्य ठाकरे


If we wanted chairs and power, we would have gone with the BJP ! : Aaditya Thackeray नाशिक (20 डिसेंबर 2025) : आमचे राजकारण मूल्यांवर आधारित आहे, सत्ताकेंद्रित नाही. आम्हाला जर फक्त खुर्चीची आणि सत्तेची चिंता असती, तर आम्ही केव्हाच भाजपसोबत गेलो असतो पण भाजपसोबत तडजोड करून सत्तेत बसण्यापेक्षा, लोकांसाठी आणि शहरांच्या हितासाठी भूमिका घेणं आम्हाला अधिक महत्त्वाचं वाटतं, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून हल्ला चढवला.

आदित्य ठाकरे शनिवारी पुणे दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शहरातील वाहतूक कोंडी, पर्यावरणाचा र्‍हास आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा पाढाच वाचला. शिवाय एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना म्हटले की, देशातील एक तरी असे शहर दाखवा जे भाजपशासित आहे आणि जिथे खरोखर सुधारणा झाली आहे. ज्या शहरांत किंवा राज्यांत भाजप सत्तेत आली, तिथे प्रगतीऐवजी उलट दिशेने प्रवास सुरू झाला आहे. प्रत्यक्ष जमिनीवर काम करण्याऐवजी दुसर्‍यांनी केलेल्या कामांची नावे बदलणे किंवा समाजात फूट पाडणे, हीच यांची राजकीय पॉलिसी आहे.

पुण्याच्या समस्यांवरून सरकारला घेरले
पुण्यातील नागरी प्रश्नांवर भाष्य करताना आदित्य ठाकरेंनी थेट अनुभवाचे दाखले दिले. मुंबई-पुणे हे अंतर आज मला कधीच नव्हते इतके मोठे वाटले. हिंजवडीसारख्या भागात 25 मिनिटांच्या अंतरासाठी आज दोन तास लागतात. याचा थेट परिणाम गुंतवणूक आणि रोजगारावर होत आहे. पुणे शहर पूर्वी इतक्या सहज पाण्यात बुडायचं नाही, पण आता परिस्थिती गंभीर झाली आहे. ही केवळ लोकसंख्येमुळे झालेली कोंडी नसून प्रशासकीय अपयश आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणालेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !