भुसावळात भाजपाला धक्का : राष्ट्रवादीच्या उमेदवार गायत्री भंगाळे नगराध्यक्षपदी विजयी

माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह माजी आमदार संतोष चौधरींची चालली जादू : समर्थकांचा मोठा जल्लोष


गणेश वाघ
भुसावळ (21 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा रविवारी सकाळी दहा वाजेपासून निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे विजयी झाल्या असून त्यांना 42 हजार 234 मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांना 40 हजार 387 मते मिळाली. एक हजार 847 मतांनी गायत्री भंगाळे-गौर विजयी झाल्या आहेत. विजयानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.

नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवारांना अशी मिळाली मते
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्शिया अन्सारी (8251), काँग्रेसच्या सविता प्रवीण सुरवाडे (4071), बसपाच्या किर्ती सुरेश वानखेडे (1096) मते मिळवून पराभूत झाल्या. 1146 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार विजयी
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक एक ‘अ’ मधून पूजा प्रेमचंद तायडे (1349) विजयी झाल्या असून प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाच्या ज्योती लक्ष्मण सोयंके (565), अपक्ष सीमा रुपेश धांडे (1180) पराभूत झाल्या तर 82 मतदारांना नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग एक ‘ब’ मधून भाजपाचे गिरीश सुरेश महाजन (1462) विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे अमोल मनोहर इंगळे (880), अपक्ष गिरीश पंडित पाटील (707), निलेश केशव महाजन (62) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी व भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग दोन ‘अ’ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उल्हास भीमराव पगारे (1548) विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार सविता रमेश मकासरे (1512), काँग्रेसच्या शुभांगी आनंद सोनवणे (331) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 65 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग दोन ‘ब’ मधून भाजपाच्या प्राची उदय पाटील (1295) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी पवार गटाच्या रत्नाबाई शांताराम जाधव (1039), अपक्ष उमेदवार ऐन्जिला रितेश नायके (50), अर्चना गणेश सपकाळे (915), मंगला विजय साळवे (99) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 58 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग तीनमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक तीन ‘अ’ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताराम दत्तू सुरवाडे (1657) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी पवार गटाच्या आशा विशाल सपकाळे (672), वंचित आघाडीचे रुपेश रमेश गायकवाड (221), कविता सुनील ढिवरे (257), किर्ती सुरेश वानखेडे (80) यांचा पराभव केला. 20 मतदारांनी नोटाचा वापर केला.

प्रभाग तीन ‘ब’ मधून काँग्रेसच्या काजल नरेंद्र मोरे (970) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या साधना रवींद्र भालेराव (930), भाजपाच्या वर्षा गणेश जाधव (318) आदींचा पराभव केला. 27 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला.

प्रभाग क्रमांक चार मधून भाजपा उमेदवाराचा विजय
प्रभाग क्रमांक चार ‘अ’ मधून भाजपा उमेदवार अर्चना विलास सातदिवे (183) विजयी झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती रवींद्र सपकाळे (110), अपक्ष अरुणाबाई सुरेश सुरवाडे (126), वंचितच्या सपना जितू संगेले (116) आदींचा पराभव केला. आठ मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग चार ब मधून भाजपाचे आशिष ईश्वरलाल पटेल (204) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी वंचित आघाडीचे विजय पवार (189) यांचा पराभव केला. एकाने नोटाचा वापर केला.

प्रभाग पाच मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक पाच ‘अ’ मधून शोभा रणधीर इंगळे (1441) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उर्मिला रामदास सावकारे (322) यांचा पराभव केला. 44 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. प्रभाग पाच ब मधून यापूर्वीच भाजपाचे परीक्षीत बर्‍हाटे बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग सहा मधून भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग सहा ‘अ’ मधून सोनम श्रेयस इंगळे (1792) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाच्या गजाला इंद्रीस गवळी (1645) यांचा पराभव केला.

प्रभाग सहा ब मधून भाजपाच्या विशाल राजेंद्र नाटकर (1710) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रकाश कोळी (965), अपक्ष उमेदवार रामेश्वर रणधीर (825) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 29 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग सातमध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय
प्रभाग सात ‘अ’ मधून प्रीती मुकेश पाटील या यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत तर प्रभाग सात ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार सुजित हेमराज पाटील (1897) विजयी झाले. त्यांनी प्रतिपर्धी भाजपाचे दिग्गज नेते अजय एकनाथ भोळे (1232), शरदचंद्र पवार गटाचे संजय झेंडू रायपूरे (235) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 45 मतदारांनी केला.

प्रभाग आठमध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग आठ ‘अ’ मध्ये भाजपाच्या अनिता सतीश सपकाळे (4556) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मानसी प्रदीप सपकाळे (597), अजित पवार गटाच्या त्रिवेणी भीमराज कोळी (644) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 122 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग आठ ‘ब’ मध्ये शिंदे गटाचा उमेदवार विजयी
प्रभाग आठ ‘ब’ मधून शिवसेना शिंदे गटाचे शारदा दीपक धांडे (2829) मतांनी विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार विशाल सतीश जंगले (1923), अपक्ष उमेदवार अक्षय रमेश भोई (524) यांचा पराभव केला. 53 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग नऊमध्ये काकांची सरशी : पुतण्याचा पराभव
शहरच नवे जिल्ह्याचे लक्ष लागू असलेल्या प्रभाग नऊमधील काका-पुतण्याच्या लढतीत भाजपाचे युवराज लोणारी यांनी पुतण्या जयंत लोणारी यांचा पराभव केला. प्रभाग नऊ ‘अ’ मधून भाजपाचे युवराज दगडू लोणारी (2235) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी पुतण्या तथा प्रतिस्पर्धी व शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयंत लोणारी (1597) यांचा पराभव केला. 60 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग नऊ ‘ब’ मधून भाजपाच्या उमेदवार पूनम वसंत पाटील (2127) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगंधरा गोपाळ जंगले (नारखेडे 1106), अजित पवार गटाचे ममता अजय डागोर (504) पराभव केला. नोटाचा वापर 57 मतदारांनी केला.

प्रभाग दहा मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक दहा ‘अ’ मधून सोनी संतोष बारसे (2718) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाचे रामदास श्रावण सावकारे (598), काँग्रेसचे प्रमोद नकवाल (398) यांचा पराभव केला. 86 मतदारांनी नोटाचे बटण दाबले.

प्रभाग दहा ‘ब’ मधून भाजपाच्या प्रिया बोधराज चौधरी (2789) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष सीमा संतोष थामेत (542), शरदचंद्र पवार गटाच्या रुपाली दीपक नेमाडे (382) यांचा पराभव केला. 87 मतदारांना नोटाचे बटण दाबले.

प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 11 अ मधून शिवसेना शिंदे गटाचे बबलू सुरेश बर्‍हाटे (1728) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार नीळकंठ रामदास भारंबे (1246) यांचा पराभव केला. 47 मतदारांनी नोटा पर्याय स्वीकारला.

प्रभाग 11 ब मधून भाजपाचे मेघा देवेंद्र वाणी (1981) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भावना अजय पाटील (1409) पराभव केला. नोटाचा वापर 47 मतदारांनी केला.

प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 12 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शेख दिलनबाज ईकबाल (3426) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शाह हसीनाबी अब्बास (553), भाजपाचे योगीता वायकोळे (249) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 83 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 12 ब मधून आसीफ खान इकबाल खान हे अपक्ष उमेदवार (2368) मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शेख शफी शेख अजीज (1040) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 32 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 13 मधून काँग्रेस उमेदवाराचा विजय
प्रभाग 13 अ मधून काँग्रेसचे रोहन राजू सूर्यवंशी (1839) विजयी झाले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नंदा प्रकाश निकम (944) यांचा पराभव केला. 131 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग 13 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुनीता कृष्णधनकर (धोनी) (1194) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या प्रतिस्पर्धी आशादेवी राकेश ओझा (1146), अपक्ष उमेदवार सोनाली विनोद निकम (633), अपक्ष उमेदवार वैष्णवी आशिष तिवारी (405) पराभव केला. नोटाचा पर्याय 80 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 14 मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग 14 अ मधून भाजपाचे उमेदवार राजेंद्र दत्तू आवटे (1863) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जयेश संतोष चौधरी (1357) पराभव केला. 51 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला.

प्रभाग 14 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुभद्रा गणपत गुंजाळ (1542) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या अंकिता राजेंद्र खोले-पाटील (1488) यांचा 54 मतांनी निसटता पराभव केला. 45 मतदारांनी नोटाचे बटन दाबले.

प्रभाग 15 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार विजयी
प्रभाग 15 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अमीन निसार कुरेशी (1963) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या अनिता पाटील (551), अपक्ष शेख मुस्ताक शेख सरदार (695) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 23 मतदारांनी केला.

प्रभाग 15 ब मधून शरदचंद्र पवार गटाच्या शेख नसीम बी.शेख नदीम (2064) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शेख सिद्रा आरीफ (761) यांचा पराभव केला. नोटाचा वापर 49 मतदारांनी केला.

प्रभाग 16 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार विजयी
प्रभाग 16 अ मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सचिन भास्कर पाटील (1897) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी अजित पवार गटाचे शेख समीर रशीद (862) व भाजपाचे सदाशीव पाटील (551) यांचा पराभव केला. 49 मतदारांनी नोटाचे बटण दाबले.

प्रभाग 16 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पल्लवी निलेश कोलते (1749) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरद पवार गटाचे नमिरा शकील पिंजारी (1254) यांचा पराभव केला. 31 उमेदवारांनी नोटाचा वापर केला.

प्रभाग 17 मध्ये राष्ट्रवादी उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 17 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अकिल नादर पिंजारी (2097) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बागवान शेख नजीम नथ्थू (1332) यांचा पराभव केला. 15 मतदारांनी नोटाचे बटण दाबले.

प्रभाग 17 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या शबाना सिकंदर खान (1990) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खान नूरजहाँ आशिक (1384) पराभव केला. 49 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला.

प्रगाग 18 मध्ये काँग्रेस उमेदवार विजयी
प्रभाग 18 अ मधून काँग्रेसचे अलमाबानो इब्राहीम कुरेशी (1621) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री राहुल बोरसे (1524) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 63 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 18 ब मधून शरदचंद्र पवार गटाच्या खान सोलील खान नसीम (1263) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस अकबर चाँद गवळी (963) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 50 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 19 मध्ये राष्ट्रवादी उमेदवाराचा विजय
प्रभाग 19 अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुष्पा कैलास चौधरी (1987) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सायली जय चौधरी (1400) पराभव केला. नोटाचा पर्याय 32 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 19 ब मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सचिन संतोष चौधरी (2123) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेख पापा शेख कालू (1017) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 38 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 20 मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 20 अ मधून भाजपाच्या सीमा प्रशांत नरवाडे (2038) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुनीता आनंद सपकाळे (1376) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 130 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग क्रमांक 20 ब मधून अपक्ष उमेदवार राज विजय चौधरी (1528) विजयी झाले. त्यांनी भाजपाच्या माजी नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे (1464) यांचा 64 मतांनी निसटता पराभव केला. नोटाचा 30 मतदारांनी पर्याय स्वीकारला.

प्रभाग 21 मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग 21 अ मधून भाजपाच्या शैलजा पुरूषोत्तम नारखेडे (1855) निवडून आल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पल्लवी महेश भारंबे (1115) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 40 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग क्रमांक 21 ब मधून यापूर्वीच भाजपाचे पिंटू कोठारी बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रभाग क्रमांक 22 अ मधून भाजपाचे महेंद्रसिंग ठाकूर (4184) विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवानी दुर्गेश ठाकूर (497) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 63 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 22 ब मधून अपक्ष मानवी अमित आहुजा (2479) विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार आरती दिनेश नेमाडे (1543) व शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा माधुरी फालक (621) यांचा पराभव केला. नोटचा पर्याय 101 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 23 मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग 23 अ मधून भाजपाच्या महिमा अजय नागराणी बिनविरोध निवडून आल्या असून 23 ब मधून भाजपाचे निकी (प्रकाश) रमेशलाल बत्रा (2013) निवडून आले. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे दीपक टेकवानी (1840) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 47 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 24 मध्ये भाजपा उमेदवार विजयी
प्रभाग 24 अ मधून भाजपाचे किरण भागवत कोलते (2932) विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार शिशिर दिनकर जावळे (687) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 74 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 24 ब मधून भाजपाच्या आशा कैलास पाटील (1717) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुषमा उमेश नेमाडे (1555) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 76 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 25 मध्ये भाजपा उमेदवारांचा विजय
प्रभाग 25 अ मधून भाजपाचे सोनल रमाकांत महाजन (2944) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाच्या वैशाली ज्ञानदेव पाचपांडे (1830), राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दीपाली बर्‍हाटे (1222) यांचा पराभव केला. नोटाचा पर्याय 121 मतदारांनी स्वीकारला.

प्रभाग 25 ब मधून भाजपाच्या छाया मुरलीधर फालक (2677) विजयी झाल्या. त्यांनी प्रतिस्पर्धी शरदचंद्र पवार गटाचे दुर्गेश ठाकूर (2444) पराभव केला. 132 मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला.

पत्रकारांचा मिडीया कक्षावर बहिष्कार
भुसावळ पालिका निवडणुकीची सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर मिडीया कक्षात तासाभरानंतरही कुठलीही माहिती देण्यात आली नाही तसेच कक्ष असूनही कुठल्याही सक्षम अधिकार्‍यांची माहिती देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्याने माध्यमांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतमोजणीस्थळी किमान एका माध्यम प्रतिनिधीला आत जाण्यास मनाई करण्यात आल्याने शहरातील सर्व प्रकारच्या माध्यमांना निवडणूक कक्षावर बहिष्कार टाकत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कृतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या 30 वर्षांच्या निवडणूक काळात प्रथमच अशा पद्धत्तीची वागणूक मिडीया प्रतिनिधींना देण्यात आल्याने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे माध्यम प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !