फैजपूरसह रावेरात कमळ उमलले : आमदार अमोल जावळेच किंगमेकर
The lotus bloomed in Raver, including Faizpur : MLA Amol Jawale is the kingmaker फैजपूर (21 डिसेंबर 2025) : सावदासह फैजपूरात झालेल्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असून यावलमध्येदेखील नगरसेवक पदाची सर्वाधिक उमेदवार येथे भाजपाचे निवडून आले आहेत. आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वात येथे निवडणुका पक्षाने लढल्याने येथे पक्षाला मोठे यश मिळाले आहे.
आमदार जावळे यांची मतदारसंघावर पकड
अमोल जावळे हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पालिका निवडणुकांना सामोरे गेले अर्थात त्यांच्या नेतृत्वात पक्षाने येथे निवडणुका लढवल्या. या मतदारसंघात यावल, रावेर आणि फैजपूर या तीन नगरपालिका असल्याने यातील निकाल हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे होते. या अनुषंगाने आमदार अमोल जावळे यांनी यंदा तिकिटे देतांनाच नवीन चेहर्यांना प्राधान्य दिले. यामुळे जुने काही प्रमाणात दुखावले गेले तरी त्यांची समजूत काढण्यात आली आणि यामुळे रावेर येथे सहज विजय मिळाला.

रावेर नगराध्यक्षपदी भाजपाच्या संगीता महाजन
रावेरात भाजपाच्या संगीता भास्कर महाजन या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून येथे भाजपाचे नऊ नगरसेवक निवडून आले आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची एक तर अजित पवार गटाचे 10 तर काँग्रेस व अपक्षांच्या प्रत्येकी दोन जागा येथे निवडून आल्या.
फैजपूर नगराध्यक्षपदी दामिनी सराफ
फैजपूर येथे प्राधान्याने तरुणाईला प्राधान्य देण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी दामिनी पवन सराफ यांना संधी देण्यात आली. निवडणुकीआधीच काँग्रेसचे उमेदवाराने अर्ज मागे घेऊन भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर दामिनी सराफ यांनी धडाक्यात प्रचार सुरू केल्यानंतर जनतेने त्यांच्या बाजूने कौल देत नगराध्यक्षपदी विराजमान केले.
यावलला भाजपाचे आठ नगरसेवक विजयी
यावलला भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला असलातरी भारतीय जनता पक्षाचे सर्वाधीक आठ नगरसेवक निवडून आल्याची बाब लक्षणीय ठरली. इतक्या मोठ्या प्रमाणात येथे पक्षाचे नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आलेत. आमदार अमोल जावळे यांनी आपल्या सोबत तरुण सहकार्यांची नवीन पिढी तयार करण्यास प्रारंभ केल्याचेही यातून अधोरेखीत झाले.
