भुसावळ पालिकेत 20 वर्षानंतर काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी : शिंदे-राष्ट्रवादी गटाला दोन जागांवर यश तर चौधरींच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक विजयी
गणेश वाघ
In the Bhusawal Municipal Council, three Congress candidates won after 20 years: the Shinde-NCP faction secured victory on two seats, while 12 corporators from Chaudhary’s NCP group were also victorious. भुसावळ (21 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदाची जागा गमावली असलीतरी भाजपाचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे भाजपाचे 25 तर माजी आमदार संतोष चौधरींच्या जनाआधार विकास पार्टीचे तब्बल 19 नगरसेवक निवडून आले होते मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपाने 27 जागांवर मजल मारली असून माजी आमदार चौधरी व आमदार एकनाथराव खडसेंच्या नेतृत्वात शरदचंद्र पवार गटाचे 12 नगरसेवक पालिकेत निवडून आले आहेत.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे 20 वर्षानंतर भुसावळात काँग्रेसला यश मिळाले आहे. या माध्यमातून काँग्रेसचा पालिकेत प्रवेश झाला आहे तर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन नगरसेवक येथे निवडून आले असून चार अपक्षांनी येथे मजल मारत सत्ताधारी व विरोधकांचा पराभव केला आहे.

नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजयी
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री चेतन भंगाळे (42 हजार 234) या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या रजनी संजय सावकारे (40 हजार 387) यांचा पराभव केला आहे.
भाजपाच्या या उमेदवारांनी प्रभागनिहाय मिळवला विजय
प्रभाग 1 अ : पूजा प्रेमचंद तायडे
प्रभाग 1 ब : गिरीश सुरेश महाजन
प्रभाग 2 ब : प्राची उदय पाटील
प्रभाग 4 अ : अर्चना विलास सातदिवे
प्रभाग 4 ब: आशिष ईश्वरलाल पटेल
प्रभाग 5 अ : शोभा रणधीर इंगळे
प्रभाग 5 ब : परीक्षीत बर्हाटे (बिनविरोध)
प्रभाग 6 अ : सोनम श्रेयस इंगळे
प्रभाग 6 ब : विशाल राजेंद्र नाटकर
प्रभाग 7 अ : प्रीती मुकेश पाटील (बिनविरोध)
प्रभाग 8 अ : अनिता सतीश सपकाळे
प्रभाग 9 अ : युवराज दगडू लोणारी
प्रभाग 9 ब : पूनम वसंत पाटील
प्रभाग 10 अ: सोनी संतोष बारसे
प्रभाग 10 ब : प्रिया बोधराज चौधरी
प्रभाग 11 ब : मेघा देवेंद्र वाणी
प्रभाग 14 अ : राजेंद्र दत्तू आवटे
प्रभाग 20 अ : सीमा प्रशांत नरवाडे
प्रभाग 21 अ : शैलजा पुरूषोत्तम नारखेडे
प्रभाग 21 ब: पिंटू कोठारी (बिनविरोध)
प्रभाग 22 अ : महेंद्रसिंग ठाकूर
प्रभाग 23 अ : महिमा अजय नागराणी (बिनविरोध)
प्रभाग 23 ब : निकी (प्रकाश) रमेशलाल बत्रा
प्रभाग 24 अ : किरण भागवत कोलते
प्रभाग 24 ब : आशा कैलास पाटील
प्रभाग 25 अ : सोनल रमाकांत महाजन
प्रभाग 25 ब : छाया मुरलीधर फालक
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) विजयी उमेदवार
प्रभाग 2 अ : उल्हास भीमराव पगारे
प्रभाग 12 अ : शेख दिलनबाज ईकबाल
प्रभाग 13 ब : सुनीता कृष्णधनकर (धोनी)
प्रभाग 14 ब : सुभद्रा गणपत गुंजाळ
प्रभाग 15 अ : अमीन निसार कुरेशी
प्रभाग 15 ब : शेख नसीम बी. शेख नदीम
प्रभाग 16 अ : सचिन भास्कर पाटील
प्रभाग 17 अ : अकिल नादर पिंजारी
प्रभाग 17 ब : शबाना सिकंदर खान
प्रभाग 18 ब : खान सोलील खान नसीम
प्रभाग 19 अ : पुष्पा कैलास चौधरी
प्रभाग 19 ब : सचिन संतोष चौधरी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विजयी उमेदवार
प्रभाग 3 अ : शांताराम दत्तू सुरवाडे
प्रभाग 16 ब : पल्लवी निलेश कोलते
शिवसेना (शिंदे गट) विजयी उमेदवार
प्रभाग 8 ब : शारदा दीपक धांडे
प्रभाग 11 अ : बबलू सुरेश बर्हाटे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विजयी उमेदवार
प्रभाग 3 ब : काजल नरेंद्र मोरे
प्रभाग 13 अ : रोहन राजू सूर्यवंशी
प्रभाग 18 अ : अलमाबानो इब्राहीम कुरेशी
अपक्ष विजयी उमेदवार
प्रभाग 7 ब: सुजित हेमराज पाटील
प्रभाग 12 ब : आसीफ खान इकबाल खान
प्रभाग 20 ब : राज विजय चौधरी
प्रभाग 22 ब : मानवी अमित आहुजा
