भुसावळात गायत्री भंगाळेंच्या विजयानंतर समर्थकांचा भरीत वांग्यांच्या कटआऊटसोबत जल्लोष


Following Gayatri Bhangale’s victory in Bhusawal, her supporters celebrated with cutouts of stuffed eggplants भुसावळ (22 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिकेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत लेवा पाटील समाजाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे-गौर या विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकाने हातात थेट चक्क भरीत वांग्याचा भला मोठा फोटो हातात घेत तहसील कार्यालयाच्या बाहेर गर्दीत जल्लोष केला. यामुळे सर्वांचे लक्ष वांग्याच्या फोटोकडे वेधले गेले व याची शहरात दिवसभर चर्चा राहिली.

वांग्याच्या कट आऊटने वेधले लक्ष
भुसावळ पालिका निवडणुकीसाठी रविवारी तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यावेळी सुरूवातीपासून नगरसेवकांचे निकाल लागून समर्थक जल्लोष करीत होते. दुपारी सर्वात शेवटी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी मतमोजणी केंद्रांच्या बाहेर असलेल्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर गुलाल उधळण्यात आला. तुतारी वाजविण्यात आली. या सर्व उत्साहात, जल्लोषात एका समर्थकाने चक्क भरीताच्या वांग्याचा भला मोटा फोटो कटआऊटच हातात घेत जल्लोष केला तर विजयी उमेदवार गायत्री भंगाळे यांना पतीने खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनीही हातात वांगे घेत गर्दीचे लक्ष वेधीले. गर्दीतील सर्वाचेच लक्ष या फोटोने वेधून घेतले होते. यावेळी अनेकांनी शिट्या वाजवून जल्लोषात सामील होत वांग्याचे कटआऊट आणणार्‍याचे कौतुक केले.

यावेळी लेवा पाटील समाजबांधवांनी सुध्दा आनंद व्यक्त केला. तहसील कार्यालयापासून घरापर्यंत जाणार्‍या जल्लोषात वांग्याचे कटआऊट सोबतच होते. रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वांग्याच्या कटआऊटने लक्ष वेधले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !