यावल-चोपडा रस्त्यावर चोरीचे वाळू नेणारे वाहन पकडले


यावल (24 डिसेंबर 2025) : शहरातून चोपड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालयासमोर वाळू चोरी करून नेणारे डंपर पोलिसांनी पकडले आहे. सदर कारवाई बुधवारी पहाटे पुर्वी करण्यात आली.डंपर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्याच्याकडे परवाना नव्हता. तेव्हा वाळे, डंपर असा 5 लाख 16 हजाराचा मुद्देमाल जप्त करून यावल पोलिसांनी एका विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

यावल शहरातून चोपडा जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर वन विभाग कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोरून डंपर क्रमांक एम.एच. 19 झेड. 6161 या द्वारे सुनील पुरुषोत्तम कोळी वय 43 रा.मरीमाता मंदिर जव जैनाबाद, जळगाव हा वाळू चोरी करून नेत होता. हा प्रकार बुधवारी पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी वाहन थांबवले. वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र वाहन चालकाकडे परवाना नव्हता.तेव्हा वाहन व वाळू असा 5 लाख 16 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व वाहन चालकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !