क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल स्पर्धेत हजारावर खेळाडूंचा सहभाग
भुसावळ (25 डिसेंबर 2025) : मध्य रेल्वेच्या मैदानावर सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या दुसर्या दिवशी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते, कबड्डी, फुटबॉलसह विविध स्पर्धा सकाळपासूनच सुरू झाल्यात. यावेळी एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. थंडीत खेळाडू हे मैदानावर विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आनंद व्यक्त करीत होते. मंळगवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धांचा समारोप गुरूवार 25 रोजी होणार आहे. यावल, बोडवड, जामनेर, भुसावळ, चोपडा, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा व रावेर या तालुक्यांमधील खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग नोंदविला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील क्रीडा चळवळीला नवी दिशा देणार्या ‘खासदार क्रीडा महोत्सव 2025 येथील मध्य रेल्वे मैदानावर मंगळवार 23 रोजी सायंकाळी मशाल प्रज्वलन करून या ऐतिहासिक महोत्सवाचा सुरूवात झाली. मध्य रेल्वे मैदानावर साकारलेला हा सोहळयात मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि पारंपरिक धनगरी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थित हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. संपूर्ण मैदानात खेळाडूंचा आत्मविश्वास, पालकांचा अभिमान आणि प्रेक्षकांमध्ये उत्साह होता. या खासदार क्रीडा महोत्सवात पहिल्याच दिवशी रावेर लोकसभा मतदारसंघातील यावल, बोडवड, जामनेर, भुसावळ, चोपडा, मुक्ताईनगर, मलकापूर, नांदुरा व रावेर या दहा तालुक्यांमधून 6 हजार 500 हून अधिक खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग नोंदविला होता. दुसर्या दिवशी 1 हजार विद्यार्थी स्पर्धेत स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.

विविध स्पर्धांमध्ये सहभाग
खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी 17 व 19 वर्षांखालील मुले व मुली विविध क्रीडा प्रकारांत आपले कौशल्य दाखवित होते. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॉक्सिंग, बॅडमिंटन तसेच अॅथलेटिक्स अंतर्गत धावणे, गोळाफेक व भालाफेक या स्पर्धांचा समावेश आहे. 23 ते 25 डिसेंबर दरम्यान चालणार्या या स्पर्धांमुळे शहरात क्रीडामय वातावरणात निर्माण झाले आहे.
सर्वात मोठे क्रीडा आयोजन
हा महोत्सव केवळ मैदानी स्पर्धांपुरता मर्यादित न राहता, तरुणांमध्ये शिस्त,आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करणारा उपक्रम ठरत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात प्रथमच हे सर्वात मोठे क्रीडा आयोजन मानले जात असून, यामुळे भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना घडवण्याची भक्कम पायाभरणी होत असल्याचे मत क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले. विविध तालुक्यातून आलेल्या खेळाडूंनी शहरात रेलचेल आहे. संध्याकाळपर्यत मध्य रेल्वेच्या भुसावळातील मैदानावर क्रीडा स्पर्धां सुरू राहात असतात.
