निंभोरा स्थानकाचा एपीआय मीरा देशमुख यांनी स्वीकारला पदभार
API Meera Deshmukh has taken charge of Nimbhora police station भुसावळ (30 डिसेंबर 2025) :निंभोरा, ता.रावेर पोलीस ठाण्याचे एपीआय हरिदास शिवराम बोचरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची जळगाव अनैतिक मानवी वाहतूक शाखेत बदली करण्यात आली व रिक्त जागेवर रावेर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक मीरा कल्पेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
सोमवार, 29 रोजी देशमुख यांनी बोचरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी बोचरे यांना कर्मचार्यांतर्फे निरोप तर नूतन अधिकार्यांचे स्वागत करण्यात आले.









