यावल नगर परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी गटातील नगरसेवकांसह स्विकारला पदभार


In the Yaval Municipal Council, the popularly elected mayor Chhaya Patil, along with the councilors from her group, assumed office यावल (30 डिसेंबर 2025) : यावल नगरपरिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया अतुल पाटील यांनी आपल्या गटातील सर्व नगरसेवकांसह सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक व दोन अपक्ष उपस्थित होते. पदभार स्विकारल्यानंतर शहरातुन भव्य रॅली काढण्यात आली होती तर भाजपाकडून गटनेते म्हणून नंदा महाजन यांची निवड करण्यात आली आहे.

नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार
यावल नगरपरिषदेत सोमवारी नराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. प्रशासनाकडून सहायक मुख्याधिकारी रविकांत डांगे, कक्ष अधीक्षक विशाल काळे यांच्याकडून नगरपरिषद सभागृहात स्वागत व पदग्रहण कार्यक्रम आयोजित केला होता व लोकनियुक्त नगराध्यक्ष छाया पाटील यांनी येथे पदभार स्विकारला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय सावंत, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, एनएसयुआयचे धनंजय चौधरी, प्रहार संघटनेचे अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघसह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी या समारंभात उबाठा, काँग्रेस व अपक्ष दोन नगरसेवकांची उपस्थिती होती. नगरपरिषदेत मनोगते पार पडल्यानंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.

यांचा रॅलीत सहभाग
रॅलीत उबाठाचे तालुकाप्रमुख शरद कोळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष सुकदेव बोदडे, उबाठा शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, उप शहरप्रमुख हारून खान, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्सार खान, प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी, गोलु माळी, प्रशांत पाटील, कामराज घारूसह मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक या रॅलीत सहभागी झाले.

मुख्याधिकारी गैरहजर, सभागृहात संताप
लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचा पदभार स्विकारण्याचा कार्यक्रम होता तरी देखील मुख्याधिकारी निशिकांत गवई हे कार्यालयात हजर नव्हते व त्यांच्या संदर्भात तक्रारी देखील प्रसंगी सभागृहात करण्यात आल्याने नगराध्यक्षांसह नवनियुक्त नगरसेवकामधुन संताप व्यक्त करण्यात आला.

भाजपा गटनेता निवड
भाजपाकडून आमदार अमोल जावळे यांच्या मागदर्शनाखाली गटनेता म्हणून नंदा राजेंद्र महाजन यांची तर उप गटनेता म्हणून राकेश कोलते यांची निवड करण्यात आली. या गटात महाजन, कोलतेंसह रूबाब तडवी, हेमराज फेगडे, कल्पना वाणी, योगेश चौधरी, सविता नन्नवरे व शुभांगी येवले आठ सदस्य आहेत

महाविकास सोबत दोन अपक्ष
या पदग्रहण सोहळ्यात महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष छाया पाटील सह उबाठाचे सागर चौधरी, वैशाली बारी असे तीन, काँग्रेसचे शेख शाहीन बानो, शालुबाई भालेराव, शेख निसार, सईदाबी याकूब, रुबीनाबी उमर कच्छी, कमरून्निसा बी.सैफूद्दीन व अपक्ष पराग सराफ व इमाम रजा समीर खान हे अपक्ष महाविकास आघाडी सोबत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !