भुसावळातील प्रभाग 25 मधील भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार


Felicitation of the newly elected BJP corporators from Ward 25 in Bhusawal भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरातील साने गुरुजी नगरातील प्रभाग क्रमांक 25 मधील रहिवाशांनी नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपातर्फे निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. छाया फालक-देशमुख व त्यांचे पती तथा समाजसेवक रुपेश देशमुख यांचा भव्य नागरि सत्कार केला. यावेळी प्रभागाच्या विकासाची ग्वाही दाम्पत्याने दिली.

प्रभागाच्या विकासाची ग्वाही
प्रभागाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले देशमुख परिवाराचा साने गुरुजी नगर प्रभाग क्रमांक 25 हा बालेकिल्ला आहे शिवाय सामाजिक बांधिलकी, लोकसंपर्क आणि समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याच्या त्यांच्या कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी व विश्वास आहे.

नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.छाया फालक-देशमुख यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला तर समाजसेवक रुपेश देशमुख यांनी जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.

या सत्कार समारंभास साने गुरुजी नगरातील नागरिक, महिला, युवक व ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात देशमुख परिवाराच्या कार्याला सलाम केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !