भुसावळातील प्रभाग क्रमांक आठमध्ये अनेक महिन्यांनी झाली स्वच्छता
सामाजिक कार्यकर्ते सुरज चौधरी यांचा पुढाकार : गटारींसह नाल्यांची झाली सफाई
After many months, cleaning was carried out in ward number eight of Bhusawal भुसावळ (31 डिसेंबर 2025) : भुसावळातील प्रभाग क्रमांक आठमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गटारी तुंबल्याने तसेच नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने रोष वाढला होता मात्र या भागातील समाजसेवक सुरज रवींद्र चौधरी यांनी पालिकेच्या नूतन नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तथा माजी आमदार संतोष चौधरी यांच्याकडे या संदर्भातील व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणेला निर्देश देताच या भागातील नाल्यांची सफाई करण्यात आली.
स्वच्छता कर्मचार्यांनी गटारीही स्वच्छ केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या भागात नियमित कचरा गाडी यावी तसेच नियमित नाल्यांची व गटारींची स्वच्छता व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

